`माझी इमारत शिंदेवाडी-१' नावाचा ब्लॉग मी ८ जुलै रोजी प्रसिद्ध केला आणि आपण सर्वांनी तो वाचला आणि आपल्या प्रतिक्रिया कळविल्या! त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपण दिलेल्या प्रतिक्रियेवरून एक गोष्ट मला जाणवली की, माझ्याप्रमाणेच किंवा त्यापेक्षा अधिक शिंदेवाडी-१ ह्या इमारतीशी भावनिक नाते आपल्या सर्वांचे होते. सुख-दुःखात आपण सर्व एकत्र राहिलो. त्यानंतर सायनाला संक्रमण शिबिरात जावे लागले आणि नंतर आपण नवीन शिवनेरी इमारतीत राहायला आलो. हा प्रवासही अतिशय महत्वाचा आहे. ह्या संदर्भात अनेक जुन्या आठवणी मला आपण सर्वजण सांगत आहेत. ते लिखाण मी सवडीनुसार करीन; परंतु तुम्ही सर्वांनी त्या आठवणी लिहिल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजेत. अशी माझी विनंती आहे.
आपला सर्वांचा- मोहन सावंत
(माझ्या ब्लॉगची लिंक देत आहे; त्यावर जाऊन तुम्ही मी लिहिलेला लेख आणि इतरांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचू शकता!) https://mazishindewadi1.blogspot.com/
धन्यवाद
No comments:
Post a Comment